नळदुर्ग -: शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के यांच्याविरूद्ध चुकीचे निवेदन देवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. झुल्फिकार पटेल यांनी दिलेल्या निवेदनाची चौकशी करून शासनाची दिशाभूल करणा-याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी जळकोट (ता. तुळजापूर) ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली.
तुळजापूर तालुक्यातील जळकोटच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांची रिक्त असलेली जागा भरावी, या मागणीसाठी सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली सहा दिवसापूर्वी आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी कुलुप ठोकले होते. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी डॉ. यु.एन. निलंगेकर यांची तात्परती झालेली बदली रद्द करून त्यांची जळकोट येथे नेमणूक करण्यात आली. आरोग्य केंद्रामध्ये सोनटक्के गैरवर्तन केले नसतानाही महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिका-यानी जळकोट येथील या प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सोनटक्के यांनी आरोग्य केंद्रातील साहित्याची मोडतोड केली. कर्मचा-यांना बाहेर काढून आरोग्य केंद्रास कुलूप लावले. यापूर्वीही गणेश सोनटक्के यांनी आरोग्य अधिकारी यांच्या कक्षेत स्वतःला कोंडून घेतले होते. या व्यक्तीपासून आरोग्य विभागाला सतत त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी अन्यथा सर्व वैद्यकीय अधिकारी येत्या काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करतील, असे निवेदनात म्हटले आहे. मात्र वास्तविक पाहता आरोग्य केंद्राला कुलूप लावताना आरोगय केंद्रात दोन नव्हे तर एकच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यवंशी हे उपस्थित होते. दोन वैद्यकीय अधिकारी हजर असते. तर कुलूप ठोको आंदोलन झाले नसते. निवेदन देऊन सोनटक्के यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहे. त्या निवेदनाशी आमचा कसलाही कुठलाच संबंध नसल्याचे डॉ. सुर्यवंशी व डॉ. निलंगेकर यांनी म्हटले आहे. तरी त्या निवेदनासंदर्भात चौकशी करून प्रशासनाची दिशाभूल व सोनटक्के यांची बदनामी करणा-या संबंधितावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.