मुंबई -: गेली २२ वर्षे कोट्यवधी क्रिकेटप्रेमींनी ज्याला देव म्हणून देव्हा - यात बसवले ... ज्याचा खेळ पाहण्यासाठी आपले अनमोल क्षण खर्ची घातले आणि आपल्या मुलांना त्याच्यासारखे बनविण्याची स्वप्ने पाहिली ... त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला रविवारी आपल्या घरच्याच मैदानावर मोठ्या मानहानीला सामोरे जावे लागले. टाळ्या ऐकण्याची सवय झालेल्या सचिनला ' हाय हाय ' चे नारे ऐकावे लागले. वानखेडेवरील कसोटी सामन्याच्या तिस - या दिवशी अवघ्या ८ धावांवर बाद झाल्यानंतर सचिनला हा भयंकर अनुभव घ्यावा लागला. 
     वय वाढल्यामुळे सचिनने आता क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारावी यासाठी त्याच्यावर सर्वच स्तरांतून दबाव वाढतो आहे. त्यातच क्रिकेटच्या मैदानावरावरील त्याची कामगिरीही खराब होत आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही त्याचा खेळ अत्यंत सुमार झाला. दुस-या कसोटीतील दोन्ही डावांमध्ये त्याला साधी दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. घरच्या मैदानावर खेळत असताना आणि भारतीय संघाला गरज असताना सचिनने अशी हाराकिरी पत्करल्यामुळे काल प्रेक्षकांच्या संतापाचा कडेलोट झाला. परिणामी सचिन आऊट झाल्यावर प्रेक्षकांनी उठून त्याच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. 

* कांबळी म्हणतो , निवृत्त व्हावं ! 

                     सचिनचा बालपनापासूनचा मित्र आणि माजी कसोटीपटू विनोद कांबळी यानेही सचिनच्या ढासळत्या कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे . सचिननं निवृत्तीचा विचार करायला हवा , असं त्यानं म्हटलं आहे .

* सौजन्‍य महाराष्‍ट्र टाईम्‍स
 
Top