मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेली परीक्षा 9 डिसेंबर 2012 रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी दि. 18 नोव्हेंबर 2012 रोजी आयोजित करण्यात आलेली ही परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती.
           माहिती अधिकारी, माहिती सहाय्यक, चित्रकार, वाहनचालक, चित्रपट जोडणीकार, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, शिपाई, वरिष्ठ दूरचित्रवाणी यांत्रिक या पदांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येत आहे. नवीन तारखेची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

 
Top