नळदुर्ग -: दुधनी (ता. अक्कलकोट) येथील बाजारात त्या महिलेवर व तिच्या नव-यावर मिरचीची पूड टाकून मारहाण करून विटंबना केलेल्या घटनेतील आरोपीस नळदुर्ग येथील राष्ट्रसेवा दल संचलित ‘आपल घरं’ च्यावतीने राष्ट्रसेवा दलाचे जेष्ठ नेते तथा जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी संगोळगी (ता. अक्कलकोट) या त्यांच्या गावी भेट देऊन दुष्टपणा सोडून दे, माणसुकीने वागण्याची त्याना लेखी समज दिली. तर अत्याचारित महिलेच्या तळेवाड (ता. अक्कलकोट) या गावी जाऊन त्यांची भेट घेवून सांत्वन केले.
दि. 20 नोव्हेंबर रोजी दुधनीच्या बाजारात मानवजातीला काळीमा फासणारी बेकायदेशीर, अन्यायाचे व माणुसकीला लाजवणारे कृत्य करण्यात आले. या घटनेत अक्कलकोट तालुक्यात 9 नराधामांनी एका महिलेलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. दुधनीच्या आठवडी बाजारात पीडित महिला आपल्या पतीसोबत खरेदी करण्यासाठी आली होती. यावेळी या दाम्पत्यावर 9 जणांनी अचानक हल्ला चढवला. पीडित महिलेच्या पतीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला बेदम मारहाण केली. यानंतर या टोळक्यानं या महिलेला विवस्त्र करून बाजारातच मारहाण केली. यावेळी प्रचंड जनसमुदायाने ही घटना पाहत होते. यावेळी कोणीही सोडवासोडवी केली नाही. ही घटना समजताच जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा, राष्ट्रसेवा दलाचे शिवराज सुर्यवंशी, संतोष बुरंगे, विश्वनाथ कानडे, विजया बिवलकर, धनश्री बिराजदार आदीजणानी रविवार दि. 25 नोव्हेंबर रोजी अत्याचारित महिलेच्या तळेवाड या गावी जाऊन भेट घेतली. यावेळी अत्याचारित महिलेला साडीचोळी देऊन सांत्वन करताना अजिबात घाबरायचे नाही, तुमचा सोबत राष्ट्रसेवा असे सांगून धीर दिला. यावेळी उपसरपंच मारूती कोंडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परमेश्वर झळके उपस्थित होते. त्यानंतर संगोळगी या गावी भेट देऊन आरोपीना समज दिली. यावेळी मुख्य आरोपीस दुष्टपणाचा विचार डोक्यातून काढून टाक, तू तुझ्या बायकोबरोबर सुखाने संसार कर आणि तिला तिच्या मुली-मुलांना चांगले सांभाळू दे, दुस-याला त्रास देण्याने खरे सुख मिळत नाही. तुझी आई, काकू, बायको या तर बायका आहेत. यांनीही नीट वागावे, असे राष्ट्रसेवा दलाचे व सगळ्यांचे सांगणे असल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर अक्कलकोट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुलानी यांचीही भेट घेतली.