नळदुर्ग -: राष्ट्रसेवा दल संचलित येथील ‘आपलं घर’ मध्ये सुरू असलेल्या बालसंस्कार शिबीराचे सोमवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण दाळींब (ता. उमरगा) येथील सामाजिक कार्यकर्ते गुलाब पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शाखा नायक खंडू वाघे यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी शिबीरप्रमुख स्वनंदी वडगावकर, राष्ट्रसेवा दल कार्यकर्ते संतोष बुरंगे, जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम जेठे, आपलं घरचे व्यवस्थापक शिवाजी पोतदार, पत्रकार शिवाजी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजावंदनाच्या कार्यक्रमानंतर संतोष बुरंगे यांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. त्यानंतर गुलाब पवार यानी शिबीरार्थी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास वसंतराव घोडके, सुमन सुर्यवंशी, धनाक्षी बिराजदार, विजया बिवलकर, मंगल शिरसे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.