नळदुर्ग -: नळदुर्ग व उमरगा तालुक्यातील मुरूम, कसगी या ठिकाणी जिल्हा पोलीस
पथकाने अचानक छापा मारून बेकायदेशीर गावठी हातभट्टी तयार दारू, रसायन व इतर साहित्य
असे मिळून सुमारे एक लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे. तर नऊ लोकांविरूद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश
लक्ष्मण शिंदे (वय 20 वर्षे, रा. कसगी, ता. उमरगा), शिवाजी शंकर राठोड (वय 45
वर्षे), करबस अप्पा कलशेट्टी (वय 45 वर्ष), भिमा संभा बनसोडे (वय 40 वर्षे), अनिल
शिलामनी भांगे (वय 35 वर्षे), संजय शंकर राठोड, राम गंगाराम राठोड, तानाजी मारूती
नागने (सर्व रा. नळदुर्ग), सतिश तेजू जाधव (रा. नाईकनगर मुरूम, ता. उमरगा) असे नऊ
लोकांविरूद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. यातील
नळदुर्ग येथे शहापूर जाणा-या रस्त्यावर टमटम व मोटारसायकलसह सुमारे 97 हजार 510 रूपये
किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर कसगी (ता. उमरगा) येथील बसस्टॉपजवळ 2
हजार 43 रूपये, मुरूम येथे 210 रूपये असे मिळून सुमारे 99 हजार 763 रूपये किंमतीचा
मुद्देमाल पोलीसानी जप्त केला. ही कारवाई रविवार रोजी सायंकाळी करण्यात आली.