![]() |
गुन्हयातील आरोपींचे सीसीटी कॅमेरातील फुटेज |
शुक्रवार दि. 23 नोव्हेंबर रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कळंब येथील दत्तनगर भागात वास्तव्यास असलेले विलास विश्वंभर पाटील हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद येथून त्यांच्या प्लॉट खरेदीच्या रजिष्टरी करण्यासाठी 27 लाख रूपये काढून स्कार्पिओ वाहन क्रं. एमएच 25 क्यु - 5 या वाहनातील मागील सिटवर पैशाची पिशवी ठेवून जात असताना वाटेत ते कमानिमित्त जुने पोलीस स्टेशन समोरील रोडवर उतरले व स्कार्पीओ चालकास सांगितले की, तू घरी जाऊन आईवडील व पत्नीस घेऊन ये असे सांगून थांबले असता चालक याने सदरील स्कार्पीओ वाहनात घेऊन त्यांचे घरासमोर आला असता तेवढयात विलास पाटील यांची मुलगी पुजा ही स्कार्पिओ वाहनात येवून बसली तेव्हा चालक हा विलास पाटील यांच्या नातेवाईकांना बोलविण्यासाठी घरात गेले असता त्यावेळेस एका मोटारसायकलवर दोन इसम आले व त्यानी मोटारसायकल स्कार्पीओ वाहनाजवळ थांबवून त्यातील एकाने गाडीचा दरवाजा उघडुन आतील मुलीस पप्पा कोठे आहेत असे म्हणून पैशाची पिशवी उचलून घेवून मौटारसायकलवर निघून गेले. अशी फिर्याद विलास विश्वंभर पाटील यांनी कळंब पोलीसात दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
![]() |
गुन्हयातील आरोपींचे सीसीटी कॅमेरातील फुटेज |
संशयित आरोपी कोणास आढळून आल्यास त्यानी कळंब पोलीस ठाणे दुरध्वनी क्रं 02473 - 262133, कळंबचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत बाचके मोबाईल नं. 9049384110, उपविभागीय पोलीस अधिकारी पी.ए. भगत मो. 9823226544, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम.डी. गुंडीले मो. 9096786218, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गोमारे मो. 9049980755, पोलीस नियंत्रण कक्ष उस्मानाबाद फोन क्रं. 02478 - 222700, 222900 यांच्याकडे संपर्क साधून माहिती द्यावी, तसेच नागरिकांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक पाटील यानी केले आहे.