पंढरपूर :- राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी कार्तिकी दशमीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदीराला भेट देवून विठ्ठल-रुक्मीणी चे दर्शन घेतले.यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने अध्यक्ष आण्णासाहेब डांगे, यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
प्रगतीच्या बाबतीत राज्याला संपुर्ण देशात प्रथम क्रमांकावर ठेव असे साकडे घातल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी मंदीर समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे, आमदार सर्वश्री भारत भालके, बबनदादा शिंदे, दिपकआबा सांळुखे, जिल्हा पोलिस प्रमुख राजेश प्रधान, प्रांतधिकारी बाबासाहेब बेलदार,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम, तहसिलदार सचिन डोंगरे, मंदीर समिती सदस्य सर्वश्री बाळासाहेब बडवे, वसंत पाटील, प्रा.जयंत भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.