
राज्यातील सर्व आमदारांनी एकत्र येवून पंढरपूर तीर्थक्षेत्राला प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत करावी यासाठी आपण आग्रही राहू तसेच या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनातर्फे सर्वोतोपरी सहाय्य करण्यात येईल अशी ग्वाहीही दिली.
सध्या कार्तिकी यात्रेमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी ऑनलाईन बुकींगची व्यवस्था महसूल प्रशासनाच्या वतीने सेतू केद्रांत करण्यात आली असून ही योजना चैत्री यात्रेपर्यंत अधिक वेगाने कार्यान्वित होईल अशी माहिती मंदीर समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे यांनी प्रास्ताविकात दिली तर राज्य शासनाने पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाला तसेच मंदीर समितीने, पंढरपूर नगरपरिषेदेला आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा आ.भारत भालके यांनी व्यक्त केली.
सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या भक्त निवासामध्ये दीडशे भाविकांची राहण्याची अद्यायावत व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी व्हिडीओकॉन कंपनीतर्फे जे.के.अग्रवाल, दिनेश शहा, ए.एस.रेड्डी, स्वप्निल छल्लारे आदी उपस्थित होते.