भुसावळ (मयूर पाटील) -: कंडारा (ता. भुसावळ) येथील श्री विठ्ठल मंदीरात दि. 1 नोव्हेंबर रोजीपासून काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि. 28 नोव्हेंबर रोजी या काकडा आरतीची सांगता होणार आहे. दि. 28 नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या महाप्रसादाचे भाविकांनी लाभ घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.