नळदुर्ग -: तामलवाडी (ता. तुळजापूर) येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असे मिळून एकूण २९ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तामलवाडी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील प्रभाकर जाधव हे आपल्या कुटुंबियासमवेत दिवाळी सणानिमित्त तेरखेडा गावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यानी तामलवाडी येथील जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील ७ हजार ३६३ रुपये रोख व सोन्याचांदीचे दागिने असे मिळून एकूण २८ हजार ९४६ रुपयाचा ऐवज चोरट्यानी चोरुन नेला. प्रभाकर जाधव तामलवाडी येथे घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत पोलीसात त्यानी तक्रारी दिल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ओहळ हे करीत आहेत.

 
Top