तुळजापूर -: तालुक्यात गेल्या महिन्यामध्ये ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असून सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडी दि. २२ नोव्हेंबर, दि. २५, २६, २७, २८ रोजी असे पाच टप्प्यात घेण्यात येणार आहे. 
               तुळजापूर तालुक्यातील नंदगाव, वडगाव लाख, आपसिंगा, मानेवाडी,  चव्हाणवाडी, चिवरी, दहिटणा, गुळहळ्ळी, हंगरगा तुळ, काटी, केमवाडी, खुदावाडी, निलेगाव, सांगवी मार्डी, सावरगाव, तीर्थ बु, कार्ला येथे दि. २२ नोव्हेंबर रोजी निवडप्रक्रिया पार पडणार आहेत. तसेच बोळेगाव, बोरी, बोरनरवाडी, चिकुंद्रा, देवसिंगा नळ, धोत्री, व्हानाळा, काक्रंबा, केशेगांव, माळुंब्रा, मसला खु, मुर्टा, मानमोडी, उमरगा चिवरी, सलगरा मड्डी, वाणेवाडी येथील ग्रामपंचायतची दि. २५ नोव्हेंबर रोजी तर दि. २६ नोव्हेंबर रोजी गंजेवाडी ग्रामपंचायतीची निवडप्रक्रिया पार पडणार आहे. दि. २७ नोव्हेंबर रोजी आरबळी, देवसिंगा तुळ, ढेकरी, गुजनूर, जळकोटवाडी, गवळेवाडी, काटगाव, खंडाळा, कुन्सावळी, लोहगाव, मोर्डा, तडवळा, पांगरदवाडी, सांगवी कार्टी, सारोळा, वागदरी येथील ग्रामपंचायतीची निवडप्रक्रिया पार पडणार आहे. दि. २८ नोव्हेंबर रोजी शिरगापूर या एका ग्रामपंचायतीची निवडप्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये दि. २२ नोव्हेंबर रोजी १७, दि. २५ नोव्हेंबर रोजी १५, दि. २६ रोजी १४, दि. २७ रोजी १४ आणि दि. २८ नोव्हेंबर रोजी १ अशा एकूण ४८ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 
Top