नळदुर्ग -: रुईगड (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) येथे बंजारा समाजाचे दोन दिवसीय राष्ट्रीय भव्य मेळावा व सतगुरु सेवालाल सतसंग चे आयोजन दि. २४ व २५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.
गोर सीकवाडी (सतगुरु सेवालाल सतसंग) या भव्य मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. रामराव बापू (पोहरादेवी), जुगनू महाराज विजापूर (कर्नाटक), गु.अ.भा. जयसेवालाल सांप्रदाईक गेमानंदजी बापू (माहूर), प्रेमसिंग महाराज कोत्तापल्ली (आंध्रप्रदेश), योगानंद महाराज (दहीफळ खंदारे, जि. जालना) सिद्धलिंग स्वामीजी (रायचूर, कर्नाटक), प्रल्हाद महाराज (सामकी याडी संस्था उमरी बु), शिवचरण महाराज (अमरगढ ता. जिंतूर), कनिराम महाराज (सदोबा सावळी, ता) आर्णी), ब्रम्हकुमार नेमीचंद राठोड (ओमशांती माऊंटआबू राजस्थान), शिख धर्मप्रचारक श्री ग्यानी रतनसिंगजी पवार (अहमदाबाद गुजरात), श्री गोपाल चैनसिंग आलोत राठोड (ओमशांती, ता.वर्ला, जि. बडवणी, मध्यप्रदेश), वैष्णवपंथ प्रेमदास महाराज (वनोली, ता. महागाव, जि. यवतमाळ), वारकरी पंथ विठ्ठल महाराज (असोला, ता. चिखली, जि. बुलढाणा), संत निरंकारी संतसंग प्रचारक फुलसिंग राठोड (काळी दौ, ता. पुसंद, जि. यवतमाळ), रामसंळी वासुदेव बन्सीलाल राठोड (भिवापूर, ता. तिवसा, जि. अमरावती) आदीजण उपस्थित राहणार आहेत.
दि. २४ नोव्हेंबर रोजी रुईगड (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) येथे सकाळी साडे दहा वाजता महापूजा करण्यात येणार असून बंजारा समाज बांधवानी मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकाद्वारे संयोजकानी केले आहे.