नळदुर्ग -: शहर व परिसरात हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ठिकठिकाणी डिजीटल फलक लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. नळदुर्ग येथे चावडी चौकात सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यासह इतर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.  अणदूर, जळकोट व परिसरातील सर्वच गावात रविवार रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे व्यापार बंद ठेवून शोकसभा घेण्यात आल्या. नळदुर्ग येथे रविवार रोजी आठवडी बाजार भरला नाही. सायंकाळी शिवसेना व ग्रामस्थांच्या वतीने चावडी चौकात सामूहिक शोकसभा घेण्यात आली. शनिवारी ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच अणदूर येथे शोकसभा घेण्यात आली. त्यानंतर खंडोबा मंदिर परिसरात शोकसभा घेण्यात आली.

 
Top