अरविंद गोरेसंस्‍थापक अध्‍यक्ष 
नळदुर्ग -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्‍टीस्‍टेट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटीचा शुभारंभ सोमवार दि. 5 नोव्‍हेंबर रोजी करण्‍यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑपरेटीव्‍ह सोसायटीचे संस्‍थापक अध्‍यक्ष अरविंदे गोरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली या सोसायटीचे काम अतिशय चांगल्‍या प्रकारे सुरू असून या सोसायटीची शाखा नळदुर्ग येथे सुरू करण्‍यात आले आहे. या सोसायटीच्‍या शाखेमुळे नळदुर्ग शहर व परिसरातील व्‍यापारी व शेतक-यांना लाभ होणार आहे. सदरील शाखा नळदुर्ग येथील मुख्‍य रस्‍त्‍यावर असणा-या चेतन कॉम्‍प्‍लेक्‍समध्‍ये सुरू करण्‍यात येत आहे. दि. 5 नोव्‍हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माजी आमदार सिद्रामप्‍पा आलुरे गुरूजी यांच्‍या हस्‍ते या शाखेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अरविंद गोरे हे राहणार असून नगराध्‍यक्ष नितीन कासार, माजी उपनगराध्‍यक्ष नय्यर जहागिरदार, माजी नगराध्‍यक्ष तथा नगरसेवक देविदास राठोड, तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे माजी चेअरमन सिद्रामप्‍पा खराडे, जिल्‍हा परिषदेचे माजी सदस्‍य गणेश सोनटक्‍के, विजय सरडे, जिल्‍हानियोजन मंडळाचे सदस्‍य शिवाजी मोरे, पंचायत समितीचे माजी सदस्‍य उत्‍तम लोमटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सोसायटीचे संचालक शिवदास कांबळे, प्रा. विलास जगदाळे, उपाध्‍यक्ष प्रताप देशमुख, शितल मेहता, लईक अहमद अ. रहिम, शहाजी मोरे, र‍णजित इंगळे, अॅड. चित्राव गोरे, गोपाळ शिंदे, माणिक रोहिले, अनिल शिंदे, डॉ. मुरलीधर चव्‍हाण, प्राचार्या सुलभा देशमुख, अरूंधती गोरे यांनी केले आहे.

 
Top