नळदुर्ग -: येथील अंबाबाई मंदिरात भव्‍य दीपोत्‍सव विविध कार्यक्रमाने उत्‍साहाने साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमास महिलांमधून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो महिलांनी एकाच वेळेस हजारो दीप लावल्‍याने दिव्‍याच्‍या प्रकाशात नवीन अंबाबाई मंदिर उजळून निघाले. यावेळी मंदिरावर कळस बसविण्‍यासाठी देणगी दिलेल्‍या 401 माहेरवाशीन लेकींची मंदीर जिर्णोद्धार समितीच्‍यावतीने ओटी भरण्‍यात आली.
श्री अंबाबाई मंदिर जिर्णोद्धार समितीच्‍या पदाधिकारी व सदस्‍यांच्‍या प्रचंड मेहनतीमुळे प्राचीन अंबाबाई मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. आज भव्‍य असे सुंदर मंदीर या ठिकाणी उभे राहिले आहे. याबद्दल नागरिकांनी जिर्णोद्धार मंदीर समितीच्‍या पदाधिकारी व सदस्‍यांचे कौतुक केले आहे. याच मंदिरात अंबाबाई मंदीर जिर्णोद्धार समितीच्‍यावतीने भव्‍य दीपोत्‍सवाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. या कार्यक्रमास शहरातील महिलांमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो दिव्‍यांच्‍या प्रकाशात मंदीर उजळून निघाले. या कार्यक्रमास जिर्णोद्धार मंदीर समितीचे सर्व सदस्‍य, अंबाबाई मंदीर समितीचे सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरीक, महिला मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top