मुंबई -: इंग्लंडचा डाव 413 धावांवर आटोपल्यानंतर भारताचा दुसरा डाव अडचणीत आला आहे. इंग्लंडच्या फिरकीपटुंनी भारताला 2 झटपट धक्के दिले आहेत. विरेंद्र सेहवागपाठोपाठ फॉर्मात असलेला चेतेश्वर पुजाराही बाद झाला आहे. ग्रॅहम स्वानच्या गोलंदाजीवर शॉर्ट लेगवर त्याचा झेल उडाला. तर त्यापुर्वी मॉन्टी पानेसरने विरेंद्र सेहवागला बाद केले. सेहवागने 9 तर पुजाराने 6 धावा काढल्या.
इंग्लंडने घेतली 86 धावांची आघाडी
पीटरसन बाद झाल्यानंतर इंग्लंडचा संघ पत्याच्या डावाप्रमाणे कोसळला. इंग्लंडचा संघ 413 धावांत संपुष्टात आला. मॅट प्रायर, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन आणि मॉंटी पानेसरने मैदानात हजेरी लावण्याचे काम केले. प्रायर बाद झाल्यानंतर संघात पुनरागमन केलेल्या हरभजनने एकाच षटकात ब्रॉड आणि अँडरसनला बाद केले. आश्विनने पानेसरला 4 धावांवर बाद केले. इंग्लंडने पहिल्या डावात टीम इंडियावर 86 धावांची आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाकडून फिरकीपटू ओझाने 5, हरभजन सिंगने 2 आणि आर अश्विनने 2 विकेट मिळवल्या.
द्विशतकाकडे वाटचाल करत असलेला आक्रमक फलंदाज केविन पीटरसनचा अडथळा ओझाने दूर केला. पीटरसनने 4 षटकार आणि 20 चौकारांच्या मदतीने 186 धावा केल्या. ओझाच्या सुंदर फिरकीने पीटरसनच्या बॅटने कड घेतली आणि चेंडू धोनीच्या हाती विसावला.
टीम इंडियावर आघाडी घेतलेल्या इंग्लंड संघाला फिरकीपटू ओझाने पाचवा धक्का दिला. त्याने समित पटेलला कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. पटेलने 26 धावा केल्या. स्टुअर्ट ब्रॉड आणि मॅट प्रॉयर जोडी मैदानात आहे. इंग्लंडने 6 विकेटच्या बदल्यात 395 धावा केल्या आहेत.
तत्पुर्वी, कर्णधार ऍलिस्टर कूक आणि स्टार फलंदाज केविन पीटरसन यांनी भारतीय गोलंदाजीला फोडून काढत झुंझार शतके ठोकली. दोघाच्या शतकाच्या जोरावर इंग्लंड दुस-या कसोटीमध्ये सुस्थितीत आहे. अखेर ही जोडी फोडण्यात भारताला यश मिळाले. आर. अश्विनने कुकला बाद केले. अश्विनच्या चेंडुवर फ्रंटफुटवर बचावात्मक शॉट खेळला. परंतु, चेंडू वळला आणि कुकच्या बँडची कड घेऊन चेंडू धोनीच्या हातात विसावला. कुक 122 धावांवर बाद झाला. त्यानंतर लंचपूर्वी भारताला चौथे यश मिळाले. जॉनी बेरस्टोव 15 धावा काढून बाद झाला. लंचला इंग्लंडने 298 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे इंग्लंड मोठी आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
कूक आणि पीटरसनने धडाकेबाज फलंदाजी करीत द्विशतकी भागीदारी केली. तिस-या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर पीटरसनने अतिशय आक्रमक फलंदाजी केली. दुस-या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी 62 तर कूक 87 धावांवर नाबाद होते. आज सर्वप्रथम कुकने शतक पूर्ण केले. त्याच्या पाठोपाठ पीटरसनने शतक ठोकले. पीटरसनने अवघ्या 127 चेंडुंमध्येच शतक पूर्ण केले.
* सौजन्य दिव्यमराठी