उस्मानाबाद -: पोलीसानी जिल्यात विविध ठिकाणी मारलेल्या छाप्यात सुमारे 87 हजार 582 रूपयाची बेकायदेशीर दारू जप्त केली . याप्रकरणी सहा जणांविरूद्ध पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी कळंब, मुरूम, शिराढोण आदी ठिकाणी छापा मारून सुमारे 87 हजार 582 रूपयाचा माल हस्तगत केला. आशाबाई बबन काळे (वय 22 वर्षे, रा. मोहा, ता. कळंब) यांच्याकडून 18 हजार 300 रूपये तर बाळु ऊर्फ बापु मखन काळे (रा. मोहा, पारधीपिढी कळंब) याच्याकडून 67 हजार 144 रूपये, बबलु ऊर्फ बापु मारूती चव्हाण (रा. नायगाव) याच्याकडून 923 रूपे, इस्माईल पाशा शेख, व्यंकट श्रीमंत करधडे (दोघे रा. तुगाव) यांच्याकडून 690, हिरा करण कसणे (वय 32 रा. मोहा, ता. कळंब) याच्याकडून 525 रूपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. याप्रकरणी वरील सहाजणांविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* अज्ञात चोरट्यांकडून महिलेच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास
शिराढोण -: मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमानी एका महिलेच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसाकावुन चोरून नेल्याची घटना दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हासेगाव (सि) ता. कळंब येथे घडली. याप्रकरणी दोघाविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. अलका व्यंकट कानडे (वय 45 वर्षे) यांच्या घरी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमानी पिण्यासाठी पाणी मागितले. तेव्हा अलका कानडे त्यांना पिण्यासाठी पाणी देत असताना सदरील इसमानी त्याचा तोंड दाबून डाव्या हातातील बोटातील 16 हजार रूपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेऊन गेल्याची फिर्याद अलका कानडे यानी शिराढोण पोलीसात दिल्यावरून दोघाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास दुय्यम फौजदार कोल्हे करीत आहेत.