उस्मानाबाद -: जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिका-यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. हा कार्यक्रम कार्यक्रम दि. 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक कार्यालयात थाटात संपन्न झाला.
उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.बी.एम. शेख, सहा्य्यक पोलीस फौजदार राजाराम कृष्णा कोळी, हज्जुखान महेबुबखान पठाण हे सेवानिवृत्त झाले. त्यांचे जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधिक्षक बी.यु. भांगे, प्रभारी पोलीस उपअधिक्षक अ. सत्तार शेख, पोलीस निरीक्षक एस.व्ही. कुलकर्णी, गावंडे, जमादार, पंडीत यांच्यासह उस्मानाबाद पोलीस मुख्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.