पुणे -: विधानमंडळाचा 75 वर्षाचा इतिहास आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, त्यानंतरचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक या दोन महाराष्ट्राच्या शिल्पकारांच्या जन्मशताब्दी निमित्ताने चित्रमय प्रदर्शन पुण्यातील विधान भवनाच्या प्रांगणात आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते फित कापून जनतेसाठी खुले करण्यात आले.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उद्योगमंत्री नारायण राणे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, दुग्धविकासमंत्री मधुकर चव्हाण, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, स्थानिक आमदार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दि. 9 ते 11 नोव्हेंबर 2012 या काळात सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रदर्शनात विधानमंडळातील घडामोडींची ऐतिहासिक छायाचित्रे पहावयास मिळतील. त्याचबरोबर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. वसंतराव नाईक यांचे कार्यकर्तृत्व छायाचित्रांद्वारे उलगडून दाखविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे चार विभाग आहेत. पहिल्या भागात विधानमंडळातील घडामोडींवर आधारित 1937 ते 2012 या कालावधीतील छायाचित्रांचा समावेश आहे. तसेच आजवरील विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधानपरिषद सभापती, उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांची छायाचित्रे पहावयास मिळतील. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 6 ऑक्टोबर 1949 रोजी पुणे विधान भवनात केलेल्या भाषणाची लिखित प्रत ही वाचावयास मिळेल.
दुसऱ्या भागामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचा समावेश आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे बालपण, त्यांचे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्य, स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्या उपस्थितीत झालेले कार्य दर्शविणारी छायाचित्रे आहेत. तिसऱ्या भागात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचा प्रेरणादायी जीवनपट आहे.
चौथ्या विभागात विधानमंडळ अमृतमहोत्सव, स्व. यशवंतरावजी चव्हाण आणि स्व. वसंतराव नाईक यांच्या चरित्रावर आधारित प्रत्येकी 10 मिनिटांचे माहितीपट दाखविण्यात येणार आहेत. इच्छुकांना या माहितीपटांची सीडी विकत घेण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ठिकाणी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील दुर्मिळ पुस्तके खरेदी करता येतील.