सोलापूर -: 26 नोव्हेंबर 2012 रोजी संविधान दिनानिमित्त येथील पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
         यावेळी महापौर श्रीमती अलका राठोड, उपमहापौर हारुन सय्यद, मनपा विरोधी पक्षनेत्या श्रीमती रोहिणी तडवळकर, राजाभाऊ सरवदे, पोलीस आयुक्त प्रदिप रासकर, मनपा आयुक्त अजय सावरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण आदि विविध पदाधिकारी, अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top