उस्‍मानाबाद -: जिल्‍ह्यातील विविध ठिकाणी मोटार वाहन कायद्याचे उल्‍लंघन करणा-या 142 वाहन चालकांविरूद्ध पोलीसानी त्‍यांच्‍या कारवाई करून सुमारे 15 हजार 200 रूपयाचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई दि. 23 नोव्‍हेंबर रोजी करण्‍यात आली.
       उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील विविध ठिकाणी ड्रायव्‍हींग लायसन्‍सजवळ न बाळगणे, रस्‍त्‍यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा रितीने वाहने उभी करणे, क्षमतेपेक्षा जास्‍त प्रवाशांची वाहतूक करणे, नियमानुसार वाहनांवर नंबरप्‍लेट न लावणे, दुचाकीवरून तिघेजण बसवुन वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, वाहनाच्‍या मालकीचे कागदपत्र जवळ न बाळगणे इत्‍यादी मोटार वाहन कायद्याचा भंग करणा-या वाहनचालकाविरूद्ध पोलीसांनी एकूण 142 वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्‍वये ही कार्यवाही करण्‍यात आली आहे. या वाहनचालकांकडून सुमारे 15 हजार 200 रूपयाची तडजोड रक्‍कम वसुल करण्‍यात आली आहे.

 
Top