मुंबई -: अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला मलेरिया झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सालेमला मागील आठवड्यापासून सातत्याने ताप येत आहे. सलग चार-पाच दिवस सालेम तापाने फणफणला आहे.
सालेमला शुक्रवारी जे जे हॉस्पिटलला तपासणीसाठी नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्याला मलेरिया झाल्याचे निदान केल्याची माहिती आहे. सालेमला शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हॉस्पिटलला आणण्यात आले होते. तपासणीनंतर त्याला ४.३० वाजता परत घेऊन जाण्यात आले. सालेमवर ऑर्थर रोड जेलमधील डॉक्टर पुढील उपचार करीत आहेत.
* सौजन्य दिव्य मराठी
* सौजन्य दिव्य मराठी