नळदुर्ग -: तुळजापूर तालुक्‍यातील निलेगाव ग्रामपंचायतीच्‍या सरपंचपदी कॉंग्रेसच्‍या अनिता दिलीप जमादार तर उपसरपंचपदी जुबेर इनामदार यांची बिनविरोध निवड झज्ञली आहे. या ग्रामपंचायतच्‍या निवडणुकीत कॉंग्रेसने स्‍पष्‍ट बहुमत मिळविले असल्‍याने अपेक्षेनुसार सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुक बिनविरोध पार पडली. निवडणुक अधिकारी म्‍हणून एस.बी. धाबेकर यांनी काम पाहिले. त्‍यांना एम.एन. नाईकवाडी, ग्रामविकास अधिकारी घोगरे यांनी सहकार्य केले.

 
Top