नवी दिल्ली -: बॉम्बस्फोट घडवून १४ लोकांच्या मृत्यूप्रकरणी दोषी आढळलेला व पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद असलेला भारतीय सरबजित सिंग याच्या सुटकेबाबत बॉलीवुड स्टार सलमान खान पुन्हा एकदा पुढे आला आहे. यावेळी त्याने माध्यमांपुढे आणि सोशल नेटवर्किंगमध्ये न बोलता थेट सरबजित सिंगची बहिणीला थेट फोन करुन शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तानमधील कोट लखपत जेलमध्ये बंद असलेल्या सरबजितची बहिण दलबीर कौर यांनी सांगितले की, सलमान खानने मला फोन केला होता तसेच माध्यमांसमोर काहीही मत व्यक्त करु नये असे सांगितले आहे. पाकिस्तानमधील तहरीक-ए-इन्साफ पक्षाचा प्रमुख व माजी क्रिकेटर इम्रान खानला फोन करुन सरबजितबाबत आपल्याला सहानुभूती असल्याचे म्हटले आहे. इम्रान खानच्या पक्षाने सरबजितला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली आहे.
कसाबला तीन दिवसापूर्वी पुण्यात फाशी दिल्यानंतर सरबजितबाबत वेगवेगळी वक्तव्ये येत असल्याने सरबजितचे कुटुंबिय चिंतेत आहे. सरबजितची बहिण आणि पत्नी आपल्या भिखीविंड या गावातच आहेत पण त्या काहीही यावर बोलत नाहीत. माध्यमांचे अनेक लोक सरबजितच्या घरी पोहचले. त्यावेळी सरबजितची पत्नी सुखप्रीत कौर जेवण बनवित होत्या. मात्र, त्या चिंताग्रस्त दिसत होत्या.
* सौजन्य दिव्य मराठी