मुंबई -: बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  प्रकृती बिघडल्यामुळे मंगळवारी तिला मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
          मनिषाच्या कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मनिषाची प्रकृती ठीक नव्हती. मनिषा बेशुद्ध पडल्यामुळे मंगळवारी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
            या महिन्यात मनिषा काठमांडूमध्ये गेली होती. तिथे तिची प्रकृती बिघडली होती. सोशल नेटवर्किंग साईटवर मनिषाने प्रकृती ठिक नसल्याचे म्हटले होते. तपासणीसाठी काही दिवसांपूर्वीच मनिषा मुंबईत परतली. दोन दिवसांपूर्वी तब्येत जास्त बिघडल्यामुळे तिला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेडिकल टेस्ट झाल्यानंतर आज (गुरुवारी) मनीषाला कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णालयात मनीषाजवळ तिची आई सुषमा कोईराला हजर आहेत.  
          मनिषाने अनेक हिंदी, तामिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे. नुकताच तिचा 'भूत 2' हा सिनेमा रिलीज झाला होता.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top