सोलापूर -: राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग (महाराष्ट्र राज्य), मुंबई यांच्या वतीने मंच अध्यक्ष व सदस्य, या पदाकरिता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे. 
  सदर निकालाची प्रत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जिल्हा कोषागार कार्यालयाच्या पाठीमागे, प्रशासकीय इमारत, सोलापूर 413 001 या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे, पात्र उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रबंधक, सोलापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांनी एका पत्रकान्वये केले आहे.       
 
Top