सोलापूर -: परमेश्वर पिंपरी ता. मोहोळ, जि. सोलापूर येथून अपहरण झालेले चंद्रकांत बंडगर हे नाहीसे झाल्याने त्यांचा शोध राज्य गुन्हे अन्वेशन विभागामार्फत घेण्यात येत आहे. श्री. बंडगर हे आढळून आल्यास अथवा त्यांच्या बाबत उपयुक्त माहिती देणा-यास पोलिस विभागाच्या वतीने योग्य ते बक्षीस देण्यात येईल. संबंधीतांनी त्यांच्याबाबतची माहिती पोस्टाने अथवा दुरध्वनीवरुन द्यावी. 
चंद्रकांत बंडगर यांच्याबाबतची माहिती गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलिस अधिक्षक सदानंद वायसे पाटील भ्रमणध्वनी क्रमांक 9011620404 या क्रमांकावर कळविण्यात यावी. असे आवाहन पोलिस अधिक्षक गुन्हे अन्वेशन विभाग (कार्यालय) पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.



 
Top