नळदुर्ग -: वेगवेगळ्या दोन रस्ते अपघातात दोघेजण ठार झाले असून यापैकी आलियाबाद (ता. तुळजापूर) शिवारात महामार्ग रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना गुरूवार रोजी घडली. तर दुसरा अपघात यमगरवाडी (ता. तुळजापूर) पाटीजवळ मोटारसायकलच्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना मंगळवार रोजी घडली.
नळदुर्ग-उमरगा महामार्गावरील आलियाबाद शिवारात हॉटेल दिल्ली दरबाराच्या पुढे असलेल्या एका हॉटेलसमोरून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक ३८ वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. अपघात मरण पावलेल्या इसमाचे नाव समजू शकले आहे. हा इसम नळदुर्ग नजीकच्या एका हॉटेलमध्ये काम करत होता. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी नळदुर्ग नजीकच्या अलसफा हॉटेलमोरील रस्त्यावरुन जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सुलतान महेबूब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनाचालकाविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख हे करीत आहेत.
दुसरा अपघात यमगरवाडी (ता. तुळजापूर) पाटीजवळ झाले असून मोटारसायकलच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. सुरेश नागप्पा दुलंगे (वय ६७ वर्षे, रा. मंगरूळ, ता. तुळजापूर) असे मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. तालुक्यातील मंगरुळ येथील सुरेश दुलंगे हे १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेताकडे मोटारसायकलवरून (एम. एच. २५/डब्ल्यू.0३0९) जात होते. यमगरवाडी पाटीजवळ त्यांच्या मोटारसायकलला एम. एच. १४/सी. ३0५६ या क्रमांकाच्या मोटारसायकलने जोराची धडक दिली. त्यात सुरेश दुलंगे हे मरण पावल्याची फिर्याद प्रशांत दुलंगे यांनी दिल्याने पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस करीत आहेत.