तुळजापूर -: येथे महाराष्ट्र नवनिर्माण एस टी कामगार सेनेच्या वतीने अश्विनी यात्रा व पौर्णिमा यात्रा या कालावधीत एसटी महामंडळाच्या तुळजापूर आगाराने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान पत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी आगार प्रमुख डी. डी. जाधव यांचा मनसेचे प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब भोसले, बाळासाहेब मोरे, प्रसाद पानपुडे, सतीश भांजी, एस एस कुलकर्णी आदीजण उपस्थित होते.