मुंबई -: एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी रुपये एक हजार इतकी रक्कम भाऊबीज सन 2012-13 करिता देण्याचा नुकताच निर्णय शासनाने घेतला आहे. आर्थिक वर्षात प्रत्येकी रुपये एक हजार इतकी रक्कम देण्यात आली होती. या वर्षात ही भेट देण्यास शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने मंजुरी दिली आहे.
नागरी, ग्रामीण व आदिवासी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट अदा करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक 201211171304161930 असा आहे.
 
Top