मुंबई -: महाराष्ट्र राज्य लॉटरीचा दिवाळी भव्यतम सोडतीचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 20 नोव्हेंबर 2012 रोजी सायंकाळी 4 वाजता रवींद्रनाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यामुळे सदरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
ही सोडत आता 22 नोव्हेंबर 2012 रोजी सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या अधिपत्याखालील उप संचालक (वि.व.ले.), महाराष्ट्र राज्य लॉटरी, जी. क्लेरिज ॲण्ड कंपनी, हाजी बंदर रोड, गाडी अड्डा पोलीस चौकीसमोर, शिवडी, मुंबई येथील कार्यालयात काढण्यात येईल.