मुंबई -: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर, 2012 या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने संपूर्ण राज्यात 'दक्षता जनजागृती सप्ताह' साजरा करण्यात आला.
दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ 29 ऑक्टोबर रोजी मुख्यालयात अधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन केला. या निमित्ताने परिक्षेत्रीय व घटक कार्यालयातर्फे भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात आले. राज्यातील विविध ठिकाणी लाच घेणे व देणेही गुन्हा आहे, भ्रष्टाचार टाळा व देश मजबूत करा, कायदेशिर व्यवहार : दूर ठेवी भ्रष्टाचार आदी घोषवाक्य असलेले फलक घेऊन यावेळी मिरवणुका काढण्यात आल्या.
दक्षता जनजागृती सप्ताहास विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, सरकारी कार्यालये, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार तसेच जनतेकडून उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला.