उस्मानाबाद -: जिल्ह्यात दि. १९ ते २५  नोव्हेंबर हा सप्ताह कौमी एकता साजरा करण्यात येत आहे.  त्यानिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-याना ही शपथ दिली. देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन यावेळी अभिवादन करण्यात आले.
      यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड, उपजिल्हाधिकारी  बी.एस.चाकूरकर, चंद्रकांत सूर्यवंशी, शिल्पा करमरकर,जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, तहसीलदार श्रीमती मेने व श्रीमती मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.                          

 
Top