सोलापूर -: येत्या १९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये कोषागार कार्यालय, सोलापूर येथे वेतन पडताळणी पथक येत आहे. यावेळी कार्यालयातील सेवानिवृत्त/ मयत व एक वर्ष सेवानिवृत्तीसाठी राहिलेल्या कर्मचा-यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करताना आहरण व संवितरण अधिकारी सांकेतांक, ज्या कर्मचा-याचे सेवापुस्तक पडताळणीसाठी सादर करणार आहात त्याचा सेवार्थ आयडी, शासन वित्त विभाग परिपत्रक दिनांक २० जानेवारी २००१ नुसार १४ मुद्दयांचे विवरणपत्र तसेच सेवापुस्तक पडताळणीसाठी व स्विकृतीसाठी कार्यालयाचे पत्र, सदर पत्रामध्ये प्राधिकृत प्रतिनिधीची नमुना स्वाक्षरी व त्याचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे वरील सर्व बाबींची पुर्तता केल्याशिवाय सदर सेवापुस्तक पडताळणीसाठी स्विकारले जाणार नसल्याचे वेतन पडताळणी पथक - पुणे विभागाचे लेखाधिकारी यांनी कळविले आहे. 

 
Top