नळदुर्ग -: येथील नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे उपनगराध्यक्ष शहबाज काझी यांनी स्विकारले.  यावेळी त्यांचा विविध संघटनेच्यावतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या चाहत्यानी फटाक्याची आतिषबाजी करुन पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
          नळदुर्ग नगरपालिकेचे नगराध्यक्ष नितीन कासार यांनी खासगी कामानिमित्त रजेवर गेल्यामुळे उपनगराध्यक्ष शहबाज काझी नगराध्यक्ष पदाची सूत्रे सोमवारपासून स्विकारल्याचे कार्यालयीन अधिक्षक प्रभाकर सुरवसे यांनी सभागृहात सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे गटनेते शब्बीरअली सय्यद सावकार यांनी पुष्पहार, शाल घालून सत्कार केला. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्हाण, राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन डुकरे, नगरसेविका सुप्रिया पुराणिक, पाणीपुरवठा समिती सभापती मुन्वर सुलताना कुरेशी, नगरसेवक अमृत पुदाले, महिला कॉंग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष सौ. सुभद्रा मुळे, जावेद काझी, माजी नगरसेवक सुधीर हजारे, कॉंग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय दळवी, शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष बसवराज धरणे, उद्धव सुरवसे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सलीम शेख, शम्मू काझी, सलमान काझी, जफर काझी, जिलानी कुरेशी, पाशा काझी, अजहर जहागिरदार, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
                शहरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, लाईट या मुलभूत सुविधासह इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी आपल्या भाषणातून अनेकानी केले. त्यावर बोलताना प्रभारी नगराध्यक्ष शहबाज काझी म्हणाले की, न.प. प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कामानिमित्त येणार्‍या प्रत्येक नागरिकास समान्माने वागणूक द्यावे, लवकरच पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून पाण्याचा अपव्यय करणार्‍या नळ कनेक्शन धारकावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या सहकार्याने शहरात पंधरा विंधन विहीर घेण्यात आले असून आवश्यक त्या ठिकाणी टाकी बसविण्यात येणार आहे. शहरवासियांच्या अपेक्षा मला मिळालेल्या या संधीचे सोने करुन पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शेवटी सर्वांचे आभार प्रभाकर सुरवसे यांनी मानले.


 
Top