मुंबई : देशाच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-याना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
"मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करीन." "मी अशीही प्रतिज्ञा करतो की, मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच, मी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन."
याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री मधुकर चव्हाण यांच्यासह मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजित कुमार जैन, यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.