उस्मानाबाद -:  अपंग व्यक्तींना त्यांचे कायदेशीर हक्क व अधिकारापासून वंचित ठेवले आहे अशी ज्यांची तक्रार असल्यास अशा अपंग व्यक्तींना आयुक्त.अपंग कल्याण यांच्याकडे लेखी तक्रार करता येईल,असे अपंग कल्याण आयुक्तालयाने कळविले आहे. 
          अपंग व्यक्ती (समान संधी, हक्काचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम १९९५ हा कायदा राज्यात दि. १ जानेवारीपासून अंमलात आलेला आहे. या कायद्यातील कलम ६२ अन्वये आयुक्त.अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य.पुणे स्वत:हून अगर कोणत्याही अपंग व्यथीत व्यक्तीच्या अर्जावरुन किंवा अन्यथा पुढील बाबी संबंधिच्या तक्रारी दाखल करता येतील. या कायद्यातील कलम ६० अन्वये कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता दि. १९  ऑगस्‍ट २००४ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र अपंग कल्याण आयुक्तालय निर्णय केलेले आहे.
               अपंग व्यक्तीचे हक्क डावलणे, अपंग व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि हक्क संरक्षणासाठी समुचित शासन आणि स्थानिक प्राधिकरणे यांनी केलेले कायदे, नियम, उपविधी, विनियम किंवा दिलेले कार्यकारी आदेश, मार्गदर्शक तत्वे किंवा सुचना यांची अंमलबजावणी न करणे, अपंग व्यक्तींना पात्र असून देखील केवळ अपंग म्हणून विविध सवलतीपासून वंचित ठेवणे अशा प्रकारच्या तक्रारी असतील तर त्या विहित नमुन्यात दाखल कराव्यात. 
            अर्जाचा विहीत नमुना आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य ३ चर्चरोड, पुणे ४११००१  दूरध्वनी क्रं. ०२०-२६१६४७१ /२६१२२०६१ फॅक्स ०२०-२६१११५९०  ई.मेल commissioner_disability@yahoo.co.in अथवा जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, या कार्यालयाकडे संपर्क साधावा.
 
Top