उस्मानाबाद -: सैनिक शाळा, सातारा येथे प्रवेश इयत्ता ६ वी च्या २०१३-१४ सत्राच्या प्रवेशासाठी मुलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश परीक्षा रविवार दि. ६ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात येईल.
           या प्रवेशासाठीची वयोमर्यादा व परिक्षा पध्दती पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता ६ वी साठी उमेदवार २ जुलै २००२  ते  १ जुलै (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा, इयत्ता ९ वी साठी उमेदवार २ जुलै १९९९ ते १ जुलै २००० (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा व इयत्ता ८ वी मध्ये शिकत असावा. (प्रवेश संख्या इयत्ता ६ वी साठी अंदाजे ६० ते ६५,  इयत्ता ९ वी साठी अंदाजे ५ ते १० अशी राहील). 
         अनुसुचित जाती १५ टक्के, अनुसुचित जमाती -साडेसात टक्के, सैनिक सेवेतील आजी व माजी कर्मचाऱ्यांची मुले २५ टक्के अशा पध्दतीने राखीव जागा राहतील. प्रवेश परीक्षा रविवार दि. ६ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात येईल. परिक्षा केंद्र इयत्ता ५ वी साठी अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापुर, लातुर, मुंबई, नागपुर नांदेड, पुणे, आणि सातारा तर इयत्ता ९ वी साठी फक्त सैनिक शाळा, सातारा येथे होईल. 
             ठराविक नमुन्यातील अर्जासह शाळेचे माहितीपत्रक व नमुना प्रश्नपत्रीकासाठी (इयत्ता ६ वी किंवा ९ वी साठी) प्राचार्य, सैनिक शाळा, सातारा यांचे नावे  फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे डिमांड ड्राफ्ट पाठवून मिळतील.  सामान्य वर्ग, संरक्षणदल, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागासवर्गातील उमेदवारासाठी रु. ४२५,  फक्त अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती मधील उमेदवारासाठी रु. २७५ (जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत जोडावी ). मनिऑर्डर्स स्विकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
            सहावीच्या प्रश्नपत्रीका मागविताना मराठी किंवा इंग्रजी प्रश्नपत्रीका हवी आहे याचा स्पष्ट उल्लेख करावा. अर्जदाराने माहितीपत्रक मागविताना स्वत:चा पुर्ण पत्ता लिहीलेले ३० X २६ सें.मी.आकाराचे व २० रुपयांचे पोस्टाचे तिकीट  पाठवावे. पोस्टाने पाठविलेले डिमांड ड्राफ्ट / रोखीने माहितीपत्रक न मिळाल्यास अथवा उशिरा मिळाल्यास त्याची जबाबदारी सैनिक शाळेवर राहणार नाही. पुर्णपणे भरलेले अर्ज सैनिक शाळा, सातारा येथे पोहोचण्याची अंतिम तारीख १०  डिसेंबर २०१२  सायंकाळी ५  वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२१६२-२३५८६० वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केलेले आहे.

 
Top