सोलापूर -: महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत तालुका स्तरावर शेतीपुरक व्यवसायासाठी शेती कौशल्य  विकास प्रशिक्षणाचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. 
            शेती कौशल्य विकास व्यवसायामध्ये- दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कूटपालन, रेशीम उत्पादन, मत्स्य व्यवसाय, मधुमक्षिका पालन, शेडनेट मधील फुलोत्पादन, भाजीपाला रोपवाटीका उत्पादन, औषधी सुगंधी वनस्पती, बिजोत्पादन कार्यक्रम, शेतीमाल उत्पादन प्रक्रिया, ठिबक / तुषार सिंचन देखभाल दुरुस्ती, सिंचन पंप व ऑईल इंजिन दुरुस्ती, गांडूळ कंपोस्ट खते तयार करणे, फवारणी यंत्र देखभाल दुरुस्ती आदी शेती पुरक व्यवसायाचे प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठ रामेती प्रशिक्षण संस्थेकडील तज्ज्ञांमार्फत दोन दिवस देण्यात येणार आहे. 
           ग्रामीण भागातील १८ ते ४० वयोगटातील इच्छुकांनी (लाभार्थ्यांनी) या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिका-याकडे विविध प्रपत्रामध्ये दिनांक ३० नोव्हेंबर २०१२ पर्यंत अर्ज भरुन द्यावा. अर्ज व प्रशिक्षणा बाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षककृषी अधिकारी, सोलापूर यांनी केले.

 
Top