सोलापूर -: संरक्षण मंत्रालय नवी दिल्लीच्या अधिपत्याखाली राज्यातील सातारा येथे असलेल्या एकमेव सैनिकी शाळेसाठी इयत्ता ६ वी व ९ वी च्या विदयार्थ्यांचे सन २०१३-१४ या सत्राकरीता प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे. इयत्ता ६ वी साठी तो उमेदवार दि. २जुलै २००२ ते १ जुलै २००३ तर इयत्ता ९ वी साठी दि. २ जुलै १९९९ ते १ जुलै २००० या कालावधीमध्ये जन्मलेला असावा.
इयत्ता ६ वी ची परिक्षा मराठी व इंग्रजी भाषेव्दारे तर इयत्ता ९ वी ची परिक्षा फक्त इंग्रजी माध्यमाव्दारे होईल. इयत्ता ६ वी साठी मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, अहमदनगर लातूर, नांदेड व सातारा तर इयत्ता ९ वी साठी फक्त सातारा येथे ही परिक्षा घेण्यात येईल.
अनुसुचित जाती व जमाती मधील विदयार्थ्यांसाठी रु. २७५/- (जातीचा दाखला जोडणे आवश्यक) तर इतर प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी रु. ४२५/- इतकी परिक्षा फी असून विदयार्थ्यांनी आपले अर्ज प्राचार्य, सैनिक शाळा सातारा यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेच्या डी.डी सह पुर्ण माहिती भरलेले अर्ज दि. १० डिसेंबर २०१२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. अधिक माहितीसाठी (०२१६२)-२३५८६०/२३८१२२ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.
* दि. नोव्हेंबर रोजी पुणे येथे माजी सैनिकांचा मेळावा
सोलापूर -: येत्या २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३.३० या वेळेत भगत पॅव्हिलियन, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप व सेंटर, खडकी पुणे येथे माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्हयातील आर्मी, नेव्ही व एअर फोर्सच्या माजी सैनिक, युध्द विधवा, तसेच विधवा व अवलंबित यांनी मोठयासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.