सोलापूर -: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूर शहरात आज येत असून त्यांच्या दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.४० वाजता भिगवण, जिल्हा पुणे येथे चेन्नई मेलने येतील. व शासकीय वाहनाने बारामतीकडे रवाना होतील. सकाळी ६.१५ वाजता शासकीय विश्रामगृह बारामती येथे आगमन व राखीव व सकाळी सोईनुसार बारामती येथून शासकीय वाहनाने पंढरपूरमार्गे सोलापूरला येतील.
* "जय महाराष्ट्र" मध्ये मंगळवारी आज प्रा. लक्ष्मण ढोबळे
मुंबई -: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या "जय महाराष्ट्र" या कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांची ध्वनिचित्रमुद्रीत मुलाखत मंगळवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ ते ९ या वेळेत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत "पाणीपुरवठा विभागाचा तीन वर्षातील आढावा" या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर यांनी केले आहे.