मुंबई -: स्‍वयंपाकासाठी इंधन म्‍हणून वापरण्‍यात येणा-या घरगुती वापरासाठी ६  ऐवजी ९ अनुदानित गॅस सिलिंडर देण्यासाठी केंद्र सरकारने जादा सिलिंडरचा भार उचलावा, ही महाराष्‍ट्र शासनाने केंद्र शासनाकडे केलेली विनंती ग्राह्य मानून केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
      फक्‍त महाराष्ट्रातच नाही तर देशातील सर्व राज्यांत ९ अनुदानित गॅस सिलिंडर देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. मात्र, सध्या काही राज्यांमध्ये निवडणुका असल्याने हा निर्णय तूर्त थांबवण्यात आला असल्याचे अधिकार्‍याने सांगितले. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी जाहीर केलेल्या तीन अतिरिक्त अनुदानित सिलिंडरमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार असून हा खर्च केंद्राने उचलावा, अशी विनंती राज्याने केली होती. सरसकट सर्वांना ९ अनुदानित गॅस सिलिंडर द्यावयाचे झाल्यास राज्याच्या तिजोरीवर २४०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

 
Top