सोलापूर -: राज्याचे गृह मंत्री आर.आर.पाटील हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.20 वाजता महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड, मुंबई येथून खाजगी हेलिकॉप्टरने जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका हेलिपॅड, पंढरपूर येथे आगमन. सकाळी 11.30 वाजता श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरिता राखीव. दुपारी 1 वाजता भक्तनिवासाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता खाजगी हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण करतील.