उस्मानाबाद :- सर्व कृषि निविष्ठा (खते, बियाणे व किटकनाशके) विक्रेते/ व परवान्यासाठी अर्ज करु इच्छिणा-यानी खते बियाणे व किटकनाशके यांचे परवाना नवीन किवा नुतनीकरणासाठी परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र/ गोडावून समाविष्ठ करण्यासाठी, परवान्यामधे दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईनद्वारे प्रक्रिया करण्याची पध्दत सुरु झाली आहे. त्यासाठी http://mahaagriiqc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद या कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.
यापुढे ऑनलाईन अर्ज न करता निविष्ठा परवाना प्रस्ताव सादर केल्यास प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही, याची जिल्हयातील सर्व विक्रेत्यांनी/ अर्जदारानी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी पंचायत समितीस्तरावर कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.