नवी दिल्ली : देशातील दहा रुपयांच्या नोटांचे रूपांतर हळूहळू नाण्यांमध्ये करण्याची योजना असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. लोकसभेत ए. कृष्णमूर्ती यांनी विचालेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री नमो नारायण मीना यांनी ही माहिती दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेने सूचना केली आहे की, देशातील सर्व दहा रुपयांच्या नोटांचे हळूहळू दहा रुपयांच्या नाण्यात रूपांतर करण्यात येणार आहे. नाण्यांचा अपेक्षित पुरवठा करणे देशांतील टांकसाळीच्या उत्पादन क्षमतेवर अवलंबून आहे. दहा रुपये मूल्य गटातील नोटा सरासरी 9 ते 10 महिनेच टिकतात, तर प्रत्येक नोट छपाईचा खर्च 96 पैसे आहे. पण दहा रुपयाचे एक नाणे निर्माण करण्यासाठी टांकसाळीला 6.10 रुपये खर्च येतो. दहा रुपयाच्या नोटेचे अल्पायुष्य लक्षात घेता यापुढे या नोटांची छपाई व्यवहार्य ठरणार नाही. नोटांच्या आयुष्याची चाचणी करण्यासाठी सरकार आणि आरबीआयने दहा लाख पॉलीमर आणि प्लास्टिक नोटांवर प्रयोग सुरू केला आहे.

 
Top