नळदुर्ग -: इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी ते चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यासाठी प्रथमच इंग्रजीमध्ये संगीतमय शिक्षणाचा धडा गिरविण्याचा अविष्कार नळदुर्ग येथील शिक्षक श्रीराम पोतदार लिखित अभिनव स्मार्ट इंग्लीश नावाची सिडी व पुस्तिकेचे प्रकाशन पत्रकारांच्यावतीने करण्यात आला.
नळदुर्ग येथील 'आपलं घर' मध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीराम पोतदार यांनी नर्सरी ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रभावी आणि शुध्द उच्चारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी अभिनव स्मार्ट इंग्लिश दोन सिडी व पाठांतर पुस्तिकेची निर्मिती केली आहे. 10 नोव्हेंबर रोजी या सिडी व पुस्तिकेचे प्रकाशन साध्या कार्यक्रमात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
श्रीराम पोतदार यानी आपल्या कल्पक बुध्दीमत्तेतून व अथक परीश्रम घेऊन तयार केलेली अभिनव स्मार्ट इंग्लिश सिडी व पाठांतर पुस्तिका ग्रामीण भागातील जे गरीब विद्यार्थी डोनेशन देवून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. या सिडी व पाठांतर पुस्तिकेचे महत्त्व म्हणजे वाचन, श्रवण आणि पठण यांच्या त्रिवेणी संगम करून संगीतमय शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. संगीतमय, प्रभावी आणि शुध्द उच्चारांमध्ये श्रीराम पोतदार यानी रोज वापरात येणारी, सोप्या भाषेत शुध्द उच्चारातील नित्यापयोगी सर्व घडामोंडीमधील शब्दांचे अर्थ या सिडीमध्ये वापरले आहेत. त्याचबरोबर या सिडीमध्ये तीस पर्यंतचे पाढे इंग्लिशमध्ये आहेत. अतिशय परिपूर्ण व अभ्यासासाठी उपयुक्त मार्गदर्शिका ही सिडी आणि पुस्तिका ठरणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसाठी श्रीराम पोतदार निर्मित अभिनय स्मार्ट इंग्लिश सिडी व पाठांतर पुस्तिका विकत घेऊन संग्रहित ठेवणे गरजेचे आहे. दि. 10 नोव्हेंबर रोजी या सिडी व पुस्तिकेचे प्रकाशन नळदुर्ग शहर संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, तानाजी जाधव, विलास येडगे, शिवाजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीराम पोतदार, शिवाजी पोतदार, संतोष बुरंगे, अण्णा सनदी, गोरख्ा जगन्नाथ आदीजण उपस्थित होते. श्रीराम पोतदार यांना ही सिडी व पुस्तिका काढण्यासाठी खंडू मुळे, शिवाजी पोतदार, अबुल हसन यांचे सहकार्य मिळाले. तर आकाशवाणीच्या प्रसिध्द निवेदिका मंजुषा गाडगीळ यांनी सिडीमध्ये निवेदकाची भूमिका बजावली आहे. तर खंडू मुळे यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.