सोलापूर :- महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी ६.५७ वाजता मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण. सकाळी ७.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. सकाळी ९.३० वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून शासकीय वाहनाने अक्कलकोटकडे प्रयाण. सकाळी १०.३० वाजता अक्कलकोट येथे आगमन व अक्कलकोट नगरपरिषदेने हान्नुरचौक येथे आयोजित केलेल्या रस्त्याच्या भूमीपूजन समारंभास उपस्थिती. सकाळी ११ ते दुपारी २ वाजता भाजपा तालुका कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. (स्थळ - प्रियदर्शनी कार्यालय, अक्कलकोट) दुपारी २ ते ३ वाजता राखीव. दुपारी ३ वाजता अक्कलकोट शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे प्रयाण. दुपारी ४ वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी ४ ते सांयकाळी ५ वाजता पत्रकार परिषद. (स्थळ - शासकीय विश्रामगृह, सोलापूर) सायंकाळी ५.३० वाजता श्री. चंद्रकांतदादा पाटील वि.प.स. यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशन समारंभास उपस्थिती (स्थळ - शिवस्मारक, नवी पेठ, शिदे चौक, सोलापूर) सायंकाळी ७ ते रात्रौ १० वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राखीव. रात्रौ १०.४५ वाजता सोलापूर रेल्वे स्थानक येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.