सोलापूर  :-  श्री क्षेत्र पंढरपूर येथे सन २०१२ कार्तिकीवारी यात्रेच्या कालावधीत दि. १८  नोव्हेंबर २०११ ते २८ नोव्हेंबर २०१२ पर्यत पंढरपूर शहरात शांतता व सुव्यवस्था राखणेसाठी श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदीरात यात्रेकरु लोकाच्या दर्शनाबाबत अपर जिल्हादंडाधिकारी पराग सोमण यांनी जाहिरानामा काढला आहे. या जाहिरनाम्यात त्यांनी पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
कार्तिकीवारी यात्रेच्य वेळी यात्रेकरुना दर्शनासाठी श्री विठठल रुक्मिणी मंदीर सार्वजनिक पुजेच्या वेळा व इतर धार्मिक विधीच्यावेळा सोडून खुले राहील. पुरुष व स्त्रीयांची एकत्र पदस्पर्श दर्शनबारी ही गोपाळपूर रोडपासून वीटभट्टी स्मशानभूमी,भुवनेश्वर मंदीर, पंचमुखी मारुती ते नदीच्या बाजूने चंद्रभागा घाटावरुन सरळ कासार घाट, विणेगल्ली,भांडीआळी चौक,एकविरादेवीच्या बोळातून पुढे दर्शन मंडपात पाय-यावरुन अंबाबाई दरवाजा सोळखांबी,दर्शनी देवळासमोरुन पश्चिम दरवाजाने बाहेर पडतील.स्त्रीयांसाठी वेगळी बारी नसून पुरुषाच्या बारीमधून स्त्रीयांनी दर्शनास जायचे आहे. पश्चिम दरवाजाने व रुक्मिणी दरवाजाच्या  उत्तरेकडील दरवाजामधून व त्यालगतचे दरवाजामधून भाविकांना आत घेतले जाणार नाही. कारण तो दरवाजा दर्शन घेवून बाहेर पडणा-या लोकांसाठी आहे. मंदीरातील उत्तर दरवाजातून व्हिव्हिआयपी, व्हिआयपी तसेच मंदिर समितीने परवानगी दिलेल्या पासप्राप्त व्यक्तींना,मंदीरसमितीच्या प्रतिनिधींनी खात्री करुन दिले परवानगीस प्राप्त व्यक्तींना सोडून इतर भाविकांना प्रवेश देता येणार नाही
. ज्या स्त्री पुरुषांना दर्शनाच्या  बारीतून जावयाचे नाही त्यांनी मुखदर्शन बारी ३३ कोटी दरवाजा जवळील गणपती दरवाजाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पूर्वेकडली प्रमुख दरवाजाने जाण्याचे आहे. सभा मंडपाचे डावेकडील विभागातून मंदिरात प्रवेश करावयाचे व सोळखांबी जवळून मुखदर्शन करुन ८४ दरवाजाने बाहेर पडून रुक्मिणी मंदिराचे मुख दर्शन बारीमध्ये सामील होवून सभा मंडपात येवून श्री रुक्मिणीचे मुख दर्शन करुन तेथून उत्तर दरवाजातून बाहेर पडावे.. मंदिराभोवती असलेल्या कोणत्याही इमारतीच्या दरवाजाने मंदिरात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. पश्चिम दरवाजासमोर मोकळया जागेत पुरुषांची अगर स्त्रियांची गर्दी करु नये. मंदिराच्या सोळखांबी जवळील उत्तरेकडील दरवाजाने कोणत्याही यात्रेकरुस जाण्यास व येण्यास मनाई आहे. त्या दरवा कुलूप लावावे. मंदीराच्या आतील अनेक दरवाजांना कुलुप लावून, दरवाजे बंद करुन दर्शनबारीचे नियोजन केले जावे. आपत्कालीन प्रसंगी तसेच प्रशासकीय व शासकीय कामाकाजास आवश्यकतेनुसार सदरचे दरवाजे उघडण्यासाठी मंदीर समितीने योग्य मनुष्यबळ नेमावे. या जाहिरनाम्यात परिस्थितीनुसार आवश्यक ते फेरबदल करुन ताबडतोब अंमलात आणण्याचा अधिकार उपविभागीय दंडाधिकारी,पंढरपूर व कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समिती,पंढरपूर यांना राहील.
 
Top