नळदुर्ग -: सलगरा मड्डी (ता. तुळजापूर) ग्रामपंचायतीच्‍या सरपंचपदी सुवर्णा घोटके तर उपसरपंचपदी जितेंद्र थिटे यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली. या ग्रामपंचायतीच्‍या सरपंच, उपसरपंच पदासाठी रविवार दि. 25 नोव्‍हेंबर रोजी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंचपदासाठी सुवर्णा घोटके तर उपसरपंचपदासाठी जितेंद्र थिटे यांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली. यावेळी नुतन सदस्‍य जनार्धन चव्‍हाण, विठ्ठल कोळी, जंगलाबाई मोरे, आण्‍णापपा वाघमारे, स्‍वाती मोरे, सरोजा चव्‍हाण, वाघमारे यांची उपस्थिती होती.

* उमरगा चिवरी सरपंचपदी बारोडे तर उपसरपंचपदी कदम

नळदुर्ग -: उमरगा चिवरी (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतीच्‍या सरपंचपदी केशरबाई नागनाथ 
बोराडे यांची तर उपसरपंचदी आण्‍णाराव दत्‍तू कदम यांची निवड करण्‍यात आली आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत सरपंच, उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंचपदी केशबरबाई बोराडे यांची तर उपसरपंचपदी आण्‍णाराव कदम यांची निवड झाल्‍याचे निवडणुक अधिका-यांनी जाहीर केले. निवडीची घोषणा होताच कार्यकर्ते, पदाधिका-यांनी गुलालाची उधळण करून विजयाचा आनंदोत्‍सव साजरा केला.

* मुर्टा ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. कदम तर उपसरपंचपदी सुरवसे

नळदुर्ग -: मुर्टा (ता. तुळजापूर) ग्रामपंचायतीच्‍या सरपंचपदी मेघा लक्ष्‍मण कदम तर उपसरपंचदी सत्‍यवान नागनाथ सुरवसे यांची निवड करण्‍यात आली. येथील ग्रामपंचायतच्‍या नऊ जागेसाठी झालेल्‍या निवडणुकीत गोपाळ सुरवसे व मधुकर सुरवसे यांच्‍या नेतृत्‍वाखालील कॉंग्रेस पक्षाचे नऊ उमेदवार निवडुन आले होते. या ग्रामपंचायतीच्‍या सरपंच, उपसरपंच पदासाठी आयोजित बैठकीत सरपंचपदी मेघा कदम तर उपसरपंचपदी सत्‍यवान सुरवसे यांची एकमताने निवड करण्‍यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्‍हणून डी.एस. खुपसे यांनी काम पाहिले. यावेळी नूतन सरपंच सौ. कदम, सत्‍यवान सुरवसे, ग्रा.पं. सदस्‍य बळीराम गायकवाड, जयसिंग गवळी, शांताबाई राठोड, आशा गुंजकर, सुनिता रणखांब यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

* बोरनदीवाडी सरपंचपदी चव्‍हाण तर उपसरपंचपदी भोसले

नळदुर्ग -: बोरनदीवाडी (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतीच्‍या सरपंचपदी कॉग्रेसच्‍या सौ. मंगल तानाजी चव्‍हाण यांची तर उपसरपंचपदी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे बाळू भानुदास भोसले यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली. बोरनदीवाडी ग्रामपंचायतीची निवडणुक बिनबिरोध काढण्‍यात आली होती.  या ग्रामपंचायतच्‍या सरपंच, उपसरपंच पदासाठी येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंच, उपसरपंच पदासाठी प्रत्‍येक एक अर्ज दाखल झाल्‍याने सरपंचपदी कॉंग्रेसच्‍या मंगल चव्‍हाण यांची तर उपसरपंचपदी राष्‍ट्रवादीचे बाळू भोसले यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्‍हणून राऊत यांनी काम पाहिले. निवडीची घोषणा होताच समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण करत आनंदोत्‍सव साजरा केला. यावेळी नेताजी पाटील, जयवर्धन गिरी, जयश्री पवार यांची उपस्थित होती. नुतन सरपं, उपसरपंच यांच्‍या निवडीचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर यांनी अभिनंदन केले आहे.

* गुजनूर ग्रामपंचायत सरपंचपदी मुलगे तर पाटील उपसरपंच

नळदुर्ग -: गुजनूर (ता. तुळजापूर) ग्रामपंचायतीच्‍या सरपंचपदी जय हनुमान ग्रामविकास पॅनलेचे आण्‍णाप्‍पा कल्‍लाप्‍पा मुलगे यांची तर उपसरपंचदी विजयश्री संतोष पाटील यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवार दि. 27 नोव्‍हेंबर रोजी आयोजित बैठकीत निवडीची घोषणा करण्‍यात आली. गुजनूर ग्रामपंचायतच्‍या जाग जागेसाठी झालेल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत जय हनुमान ग्रामविकास पॅनलने सहा जागा बिनविरोध काढण्‍यात यश मिळविले होते. उर्वरित एका जागेसाठी सख्‍ख्‍या चुलत जावा-जावात लढत रंगली होती. यामध्‍ये गितांजली भरत साळुंके यांचा निसटता पराभव झाला तर विजयश्री संतोष पाटील या अपेक्ष उमेदवाराने विजय मिळवला होता. या निवडणुकीत पॅनलप्रमुख साहेबराव साळुंके, व्‍यंकट साळुंके, भास्‍कर नागमोडे, सु्ग्रीव साळुंके यांच्‍या मार्गदर्शनाखाली यश संपादनप केले. यावेळी नागनाथ साळुंके, सुभाष मुलगे, संजू मोरे, अनिल साळुंके, विनायक नागमोडे, दुधाजी वाघमारे, महादेव गायकवाड, सुरेश मुलगे, दयानंद मोरे यांच्‍या महिला व नागरीक उपस्थित होते.

 
Top